महाराष्ट्र पोलीस भरती अर्ज फॉर्म

महाराष्ट्र पोलीस भरतीविषयी माहिती मिळवण्यासाठी फॉर्म भरा

महाराष्ट्र पोलीस भरती 2026

महाराष्ट्र पोलीस भरती – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र पोलीस दलाची ओळख

महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील सर्वात मोठ्या व शिस्तबद्ध पोलीस दलांपैकी एक आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांचे संरक्षण करणे, गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे ही या दलाची प्रमुख जबाबदारी आहे.

  • 👮‍♂️ सध्या कार्यरत पोलीस कर्मचारी : २.२ – २.४ लाख
  • 📌 दरवर्षी भरल्या जाणाऱ्या जागा : ३०,००० – ४५,०००
  • 🪖 पदांची संख्या : १०+ विविध पदे
  • 📝 भरती प्रक्रिया : ग्राउंड टेस्ट + लेखी परीक्षा
  • 🏛️ नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी शासकीय नोकरी
Maharashtra Police Training

महाराष्ट्र पोलीस भरती – वयोमर्यादा व पगार

भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा आणि वेतन सुविधा

📅वयोमर्यादा

  • सामान्य प्रवर्ग : 18 ते 28 वर्षे
  • SC / ST / OBC / EWS : शासन नियमानुसार सवलत
  • माजी सैनिक व खेळाडूंना विशेष सवलत

💰पगार व सुविधा

  • ७ वा वेतन आयोग लागू
  • DA, HRA, TA, मेडिकल सुविधा
  • पेन्शन व इतर शासकीय लाभ

महाराष्ट्र पोलीस भरती २०२६ : महत्वाच्या लिंक्स

JEE Main + Advanced
माहितीपत्रक डाऊनलोड करा
Click Here
JEE Main
ऑनलाईन अर्ज भरा
Click Here
NEET-UG
शुल्क भरा
Click Here

Download Pariksha Portal App

महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया

महाराष्ट्र पोलीस भरतीतील टप्प्याटप्प्याची निवड प्रक्रिया

1

ग्राउंड चाचणी (Physical Test)

महाराष्ट्र पोलीस भरतीतील टप्प्यांपैकी सर्वात महत्त्वाची टप्पा आहे.

उमेदवारांचे समाविष्ट चाचण्या :

  • उंची मोजणी (पुरुष : 165 से.मी. / महिला 155 से.मी. – पदानुसार)
  • छाती मोजणी (पुरुष उमेदवारांसाठी)
  • वजन तपासणी
  • धावणे (1600 मीटर / 800 मीटर – पदानुसार)
  • गोळा फेक
  • उंच उडी
  • लांब उडी
👉 ग्राउंड चाचणी गुणांच्या आधारे किंवा पात्र / अपात्र पद्धतीने घेतली जाते.
Running Test
Height Check
Shot Put
High Jump
Long Jump
2

लेखी परीक्षा (Written Exam)

लेखी परीक्षा ही उमेदवारांची बुद्धिमत्ता, ज्ञान आणि अभ्यासाची चाचणी असते.

परीक्षेचे स्वरूप :

  • वस्तुनिष्ठ प्रश्न (MCQs)
  • मराठी + इंग्रजी भाषा
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • गणित
👉 लेखी परीक्षेतील गुण अंतिम गुणवत्ता यादीत समाविष्ट होतात.
Written Exam

महाराष्ट्र पोलीस भरती

पदनिहाय पात्रता, पगार व निवड प्रक्रिया

⭐ टीप: खाली दिलेला लेखी परीक्षा अभ्यासक्रम महाराष्ट्र पोलीस भरतीतील बहुतांश सर्व पदांसाठी (पोलीस शिपाई, ASI, PSI, API) समान आहे.

📌 अधिकृत माहिती: mahapolice.gov.in | maharashtrapolice.gov.in
✍️ लेखी परीक्षा अभ्यासक्रम

🟠 मराठी अभ्यासक्रम

क्रमांक घटक सविस्तर अभ्यासक्रम
1 व्याकरण (मूलभूत) नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, काळ, लिंग, वचन
2 संधी स्वर संधी, व्यंजन संधी
3 समास तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीहि, अव्ययीभाव
4 शब्दसंपत्ती समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दयोग
5 वाक्यरचना वाक्य शुद्धी, वाक्य दुरुस्ती, चूक ओळखणे
6 म्हणी व वाक्प्रचार म्हणी, वाक्प्रचार, योग्य उपयोग
7 वर्णविचार क्रियापदाचे अर्थ, विभक्ती, सामासिक पद, योग
8 क्रियापद क्रियापदाचे अर्थ व उपयोग
9 विभक्ती विभक्तीचे प्रकार व उपयोग
10 योग शब्दयोग व त्याचा उपयोग
11 विरामचिन्हे पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह इ.
12 वाक्याचे प्रकार विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी
13 वाक्य परिवर्तन वाक्यांचे प्रकारांतर
14 वाक्य पृथक्करण सरळ व संयुक्त वाक्यांचे पृथक्करण
15 महत्त्वाचे शब्द वारंवार विचारले जाणारे शब्द
16 एक शब्द – अनेक अर्थ अर्थभेद ओळखणे
17 समान वाटणारे शब्द उच्चार व अर्थातील फरक
18 जोडशब्द योग्य जोडशब्दांचा वापर
19 शब्दसमूहासाठी एक शब्द वाक्य संक्षेप
20 अलंकारिक शब्द अलंकारयुक्त शब्दप्रयोग
21 अलंकार उपमा, रूपक, अनुप्रास इ.
22 वृत्त छंद व वृत्तांची ओळख
23 रस नऊ रस व त्यांचे अर्थ
24 विनोदी / दशक शब्द विशिष्ट अर्थाचे शब्द
25 प्राणी व त्यांची घरे प्राणी–निवास नावे
26 प्राणी व त्यांची पिल्ले पिल्लांची नावे
27 समूहदर्शक शब्द समूहासाठी वापरले जाणारे शब्द
28 मराठीतील टोपणनावे व्यक्ती व ठिकाणांची टोपणनावे
29 लेखक व साहित्य प्रसिद्ध लेखक व त्यांची कृती
30 संकीर्ण मिश्र स्वरूपाचे प्रश्न
31 सराव प्रश्न पूर्वी विचारलेले प्रश्न

🔵 गणित अभ्यासक्रम

क्रमांक घटक सविस्तर अभ्यासक्रम
1 संख्या पद्धती नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, सम व विषम संख्या, त्रिकोणी, चौरस, पंचकोनी, षट्कोनी संख्या, मूळ, संयुक्त, सहमूळ, जुळी मूळ संख्या, परिमेय, अपरिमेय, वास्तविक संख्या, विरुद्ध, सलग संख्या
2 बेरीज व वजाबाकी बेरीज–वजाबाकीचे नियम, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, लहान–मोठी संख्या तयार करणे, संख्यांची तुलना
3 स्थानिक किंमत स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, चाचण्या
4 अपूर्णांक साधे व मिश्र अपूर्णांक, अपूर्णांकांचे साधीकरण, समान व वेगवेगळ्या हरांचे अपूर्णांक, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक ↔ दशांश रूपांतरण, शब्दप्रश्न
5 संकेतांक पद्धत VBODMAS नियम, उदाहरणे
6 ल.सा.वी. व म.सा.वी. LCM व HCF काढण्याच्या पद्धती, LCM × HCF नियम, अपूर्णांकांवरील LCM–HCF, शब्दप्रश्न
7 सरासरी सरासरीची संकल्पना, साधी व वजनित सरासरी, सरासरीवर आधारित शब्दप्रश्न
8 घातांक घातांकाचे नियम, ऋण व शून्य घातांक, साधे गणितीय प्रश्न
9 वर्ग व वर्गमूळ संख्येचा वर्ग, वर्ग ओळखणे, वर्गमूळ काढणे, दशांशाचे वर्गमूळ, शब्दप्रश्न
10 करणी करणीची ओळख, साधी करणी, करणीचे साधीकरण, बेरीज व वजाबाकी
11 शेकडेवारी टक्केवारीची संकल्पना, अपूर्णांक/दशांश ↔ टक्केवारी, वाढ–घट, सरासरी टक्केवारी, शब्दप्रश्न
12 नफा व तोटा खरेदी किंमत, विक्री किंमत, नफा–तोटा, नफा–तोट्याची टक्केवारी, व्यापारी शब्दप्रश्न
13 सरळ व्याज SI संकल्पना, सूत्र (SI = PRT/100), रक्कम, कालावधी आधारित प्रश्न
14 चक्रवाढ व्याज CI संकल्पना, वार्षिक चक्रवाढ, रक्कम काढणे, CI व SI मधील फरक
15 सूट, कमिशन व दलाली दर्शनी किंमत, विक्री किंमत, सूट टक्केवारी, कमिशन व दलाली, व्यापारी शब्दप्रश्न

🟢 सामान्य ज्ञान अभ्यासक्रम

क्रमांक घटक सविस्तर अभ्यासक्रम
1 राज्यातील पोलीस प्रशासन महाराष्ट्र पोलीस संघटना रचना, पोलीस महासंचालक (DGP), पोलीस आयुक्त प्रणाली, जिल्हा पोलीस अधीक्षक (SP), पोलीस ठाण्याची रचना, पोलीस अधिनियम, पोलीस भरती प्रक्रिया, SRPF, CID, ATS, STF
2 महाराष्ट्राचे मुलकी प्रशासन राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, ग्राम प्रशासन
3 पंचायतराज ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पंचायतराज अधिनियम, आरक्षण व्यवस्था, ग्रामविकास अधिकारी
4 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, महापौर, नगरसेवक, आयुक्त, स्थानिक कर व निधी
5 भारताचा इतिहास प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत, महाराष्ट्राचा इतिहास, स्वातंत्र्यलढा, समाजसुधारक, ब्रिटिश काळातील कायदे
6 समाजसुधारक महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, संत परंपरा, महिला सुधारणा, शिक्षण चळवळ
7 भारतीय राज्यघटना राज्यघटनेची निर्मिती, उद्देशिका, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये, राज्य धोरण निर्देशक तत्त्वे, संसद, न्यायपालिका, निवडणूक आयोग
8 अर्थशास्त्र मूलभूत संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्न, महागाई, बेरोजगारी, पंचवार्षिक योजना, बजेट, कर प्रणाली, बँकिंग
9 विज्ञान व तंत्रज्ञान भौतिकशास्त्र (दैनंदिन उपयोग), रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अवकाश विज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान, नवीन शोध
10 संगणक व माहिती तंत्रज्ञान संगणक मूलतत्त्वे, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, इंटरनेट, ई-मेल, सायबर सुरक्षा, डिजिटल इंडिया
11 महाराष्ट्राचा भूगोल भौगोलिक स्थान, हवामान, नद्या, पर्वतरांगा, मृदा प्रकार, पिके, धरणे
12 भारताचा भूगोल भारताचे स्थान, पर्वतरांगा, नद्या, हवामान, नैसर्गिक साधनसंपत्ती, शेती, वाहतूक
13 जगाचा भूगोल खंड, महासागर, प्रमुख देश, पर्वत, नद्या, जागतिक हवामान, महत्त्वाची स्थळे
14 संकीर्ण माहिती चालू घडामोडी, पुरस्कार, खेळ, महत्त्वाचे दिवस, योजना, व्यक्ती, संक्षिप्त तथ्ये

🟣 बुद्धिमत्ता अभ्यासक्रम

क्रमांक घटक सविस्तर अभ्यासक्रम
1 क्रमबद्ध मालिका संख्या मालिका, वर्णमालिका, संख्या-वर्णमालिका, लुप्तांक मालिका, वाढती / घटती मालिका
2 विजोड / विसंगत पद ओळखणे विजोड पद, संख्या, वर्ण, आकृती / वस्तू आधारित
3 समान संबंध / परस्पर संबंध शब्द-शब्द, संख्या-संख्या, वर्ण-वर्ण, संख्या-वर्ण
4 सांकेतिक लिपी / भाषा वर्ण-वर्ण, वर्ण-अंक, अंक-अंक, मिश्र सांकेतिक भाषा
5 संख्या संचातील अंक शोधणे क्रम व मोजणी आधारित प्रश्न
6 आकृतीमधील अंक शोधणे (भाग 1) आकृतीतील लपलेले अंक
7 आकृतीमधील अंक शोधणे (भाग 2) जटिल आकृती आधारित प्रश्न
8 वेन आकृती (भाग 1) दोन संचांवरील प्रश्न
9 वेन आकृती (भाग 2) तीन संचांवरील प्रश्न
10 विधान व अनुमान विधानावर आधारित अनुमान, कारण-कार्य, योग्य / अयोग्य अनुमान
11 क्रमावर आधारित प्रश्न डावीकडून / उजवीकडून क्रम, उंची-वजन आधारित क्रम
12 दिशा व अंतर उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम, अंतर मोजणे
13 कॅलेंडर / दिनदर्शिका आठवड्याचे दिवस, अधिवर्ष (Leap Year), तारीख व दिवस
14 आकृतीतील आरशातील प्रतिमा आरसा प्रतिमा, अक्षर / आकृती आधारित प्रतिमा
15 पाण्यातील प्रतिमा उलटी प्रतिमा, अक्षर / आकृती
16 आकृतीतील मोजणी त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, मिश्र आकृती
17 नातेसंबंध कुटुंब संबंध, पुरुष / स्त्री आधारित, कोडिंग संबंध
18 तुलनात्मक प्रश्न वय तुलना, उंची / वजन, मोठे-लहान, जास्त-कमी
19 घड्याळावरील प्रश्न तास-मिनिट काट्यांतील कोन, विशिष्ट वेळ
20 निर्देशन व आकलन माहिती वाचन व समज
21 संकीर्ण मिश्र प्रकारचे बुद्धिमत्ता प्रश्न

🏅 महाराष्ट्र पोलीस भरती – निवड प्रक्रिया

🏃 Stage 1 – शारीरिक चाचणी (Physical Test / PET)

एकूण गुण 50 गुण
किमान पात्रता 25 / 50 (50%)
प्रकार धावणे, 100 मीटर स्प्रिंट, गोळाफेक,उंची मोजणी (पुरुष : 165 से.मी. / महिला : 158 से.मी. – पदानुसार)
पुरुष 1600 मीटर धावणे
महिला 800 मीटर धावणे

👉 25 पेक्षा जास्त गुण मिळाल्यासच उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरतो.

📝 Stage 2 – लेखी परीक्षा

एकूण प्रश्न 100
एकूण गुण 100 गुण
वेळ 90 मिनिटे
निगेटिव्ह मार्किंग नाही
किमान पात्रता साधारण 40%

📊 विषयानिहाय गुणवाटप

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 20 – 25
बुद्धिमत्ता / Reasoning 20 – 25
गणित 20 – 30
मराठी व्याकरण 20
एकूण 100

🩺 Stage 3 – कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी

  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी
  • अंतिम गुणवत्ता यादी व नियुक्ती

👉 अंतिम निवड = शारीरिक + लेखी परीक्षेतील गुणांवर आधारित.

📅 अपेक्षित वेळापत्रक (Expected Schedule)

शारीरिक चाचणी 20 जानेवारी 2026 पासून
लेखी परीक्षा मार्च – एप्रिल 2026 (अपेक्षित)

📅 महाराष्ट्र पोलीस भरती – परीक्षा तारीख

लेखी परीक्षा:
महाराष्ट्र पोलीस भरतीची लेखी परीक्षा अधिकृत जाहिरात / नोटिफिकेशननुसार आयोजित केली जाते.

परीक्षा तारखा पोस्टनिहाय व जिल्हानिहाय वेगवेगळ्या असू शकतात.

🔔 अंतिम परीक्षा तारीख, प्रवेशपत्र व वेळापत्रकासाठी mahapolice.gov.in पहा.

महाराष्ट्र पोलीस का जॉइन करावे?

महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सहभागी का व्हावे?

महाराष्ट्र पोलीस होणे म्हणजे अभिमान

महाराष्ट्र पोलीस दलात सामील होणे हा केवळ नोकरीचा प्रश्न नाही, तर राज्यसेवेचा आणि सन्मानाचा विषय आहे. पोलीस कर्मचारी समाजात विश्वास, शिस्त आणि न्यायाचे प्रतीक मानले जातात.

उत्कृष्ट प्रशिक्षण व कौशल्य विकास

महाराष्ट्र पोलीस भरतीनंतर उमेदवारांना शारीरिक, मानसिक व कायदेशीर प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण तुम्हाला जबाबदार अधिकारी म्हणून घडवते.

पोलीस गणवेशाचा मान आणि प्रतिष्ठा

पोलीस गणवेश हा अधिकार, जबाबदारी आणि सन्मानाचे प्रतीक आहे. समाजात पोलीस अधिकाऱ्यांकडे आदराने पाहिले जाते आणि हा मान कायम राखण्याची जबाबदारी असते.

देशभक्ती, कर्तव्य व शिस्त

महाराष्ट्र पोलीस दलात सेवा करताना देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि शिस्त हे जीवनमूल्य अंगीकारले जातात.

समाजाचे रक्षण व सेवा

गुन्हेगारी रोखणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, आपत्तीच्या वेळी मदत करणे – महाराष्ट्र पोलीस समाजाच्या सुरक्षेचा कणा आहे.

शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक ताकद

पोलीस प्रशिक्षणामुळे उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या सक्षम व आत्मविश्वासपूर्ण बनतो, जे आयुष्यभर उपयोगी ठरते.

राज्यभर काम करण्याची संधी

महाराष्ट्र पोलीस दलात काम करताना राज्यातील विविध जिल्हे, शहरे आणि ग्रामीण भागात सेवा देण्याची संधी मिळते. यामुळे अनुभव, जबाबदारी आणि नेतृत्वगुण विकसित होतात.

सेवेसाठी तयार आहात का?

महाराष्ट्र पोलिस दलात सहभागी होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिलं पाऊल टाका. शिस्त, सन्मान आणि समाजसेवेच्या या प्रवासात सहभागी व्हा.

📞 आत्ताच कॉल करा : 9226614841
महाराष्ट्र पोलीस भरती

महाराष्ट्र पोलीस भरती

महाराष्ट्र पोलीस ऑनलाइन टेस्ट सिरीज

खाली महाराष्ट्र पोलीस भरती 2026 साठी तयार केलेल्या ऑनलाइन व टेस्ट सिरीजची प्रमुख वैशिष्ट्ये दिली आहेत. ही संपूर्ण तयारी लेखी परीक्षा तसेच शारीरिक चाचणीसाठी उपयुक्त आहे.

दररोज शंका निरसन सत्र

दररोज थेट शंका निरसन सत्रांद्वारे सर्व विषयांतील अडचणी सोप्या पद्धतीने दूर केल्या जातात.

ऑनलाइन टेस्ट सिरीज व मॉक टेस्ट

लेखी परीक्षेच्या धर्तीवर तयार केलेल्या मॉक टेस्ट, तत्काळ निकाल व कामगिरी विश्लेषणासह.

संपूर्ण अभ्यास साहित्य

नवीन अभ्यासक्रमावर आधारित नोट्स, प्रश्नसंच, मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका आणि सराव पेपर्स उपलब्ध.

शारीरिक चाचणी मार्गदर्शन

धावणे, उंची, छाती व इतर शारीरिक चाचण्यांसाठी योग्य सराव पद्धती व तज्ज्ञ मार्गदर्शन.

वेळ व्यवस्थापन व रणनीती

कमी वेळेत जास्त गुण मिळवण्यासाठी स्मार्ट ट्रिक्स, वेळ व्यवस्थापन व चुका टाळण्याच्या पद्धती.

निवड प्रक्रिया मार्गदर्शन

अर्ज प्रक्रिया, कागदपत्र पडताळणी, मेरिट लिस्ट व अंतिम निवड प्रक्रियेबाबत संपूर्ण मार्गदर्शन.

महाराष्ट्र पोलीस भरती टेस्ट सिरीज 2026

महाराष्ट्र पोलीस भरती 2026 साठी परिपूर्ण ऑनलाइन टेस्ट सिरीज

प्रत्येक विषयावर प्रभुत्व मिळवा, वेग वाढवा आणि अंतिम परीक्षेसाठी आत्मविश्वास मिळवा.

अमर्यादित ऑनलाइन टेस्ट

तुम्हाला हवे तितक्या वेळा सराव परीक्षा द्या आणि प्रत्येक विषयात पारंगत व्हा.

10,000+ सराव प्रश्न

पोलीस भरती परीक्षेसाठी उपयुक्त असा विस्तृत प्रश्नसंच – गणित, बुद्धिमत्ता, मराठी व सामान्य ज्ञान.

दैनिक सराव टेस्ट

दररोज नवीन प्रश्नपत्रिका – सातत्यपूर्ण अभ्यासासाठी उपयुक्त.

साप्ताहिक टेस्ट

आठवड्याचा अभ्यास तपासण्यासाठी विषयवार आणि मिश्र प्रश्नपत्रिका.

पूर्ण लांबीची मॉक टेस्ट

वास्तविक परीक्षेसारख्या वेळबद्ध मॉक टेस्ट्सद्वारे अंतिम तयारी.

दैनिक अभ्यास नोट्स

झटपट पुनरावृत्तीसाठी सोप्या, मुद्देसूद व परीक्षाभिमुख नोट्स.

महाराष्ट्र पोलीस भरती तयारी

महाराष्ट्र पोलीस भरती 2026 साठी आमच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली संपूर्ण तयारी करा. खाली दिलेल्या टप्प्यांद्वारे तुमचा यशस्वी निवडीचा प्रवास सुरू करा!

नियोजित अभ्यास योजना

लेखी परीक्षा व शारीरिक चाचणीसाठी परीक्षाभिमुख अभ्यासक्रम, विषयवार ऑनलाइन मार्गदर्शन, MCQ सराव आणि शंका समाधान सत्रांद्वारे मजबूत पाया तयार करा.

मॉक टेस्ट व प्रगती विश्लेषण

नियमित टेस्ट सिरीजद्वारे वास्तविक परीक्षेचा अनुभव घ्या, Pariksha Portal वरून तुमची कामगिरी तपासा आणि गुण सुधारण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन मिळवा.

शारीरिक तयारी व अंतिम निवड

शारीरिक चाचणी (PET) साठी योग्य प्रशिक्षण, वैद्यकीय तपासणी मार्गदर्शन आणि अंतिम गुणवत्ता यादीसाठी संपूर्ण सहाय्य.

महाराष्ट्र पोलीस भरती 2026 – (FAQs)

पात्रता, परीक्षा पद्धत, निवड प्रक्रिया आणि अर्जाबाबतची संपूर्ण माहिती

महाराष्ट्र पोलीस भरती ही राज्यस्तरीय भरती प्रक्रिया असून त्यामार्फत पोलीस शिपाई, SRPF, होमगार्ड, ASI, PSI, API अशा विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते.

महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालनालय (Maharashtra Police Department) यांच्या मार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाते.

महाराष्ट्र पोलीस भरती 2026 चे अधिकृत वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. साधारणतः शारीरिक चाचणी जानेवारी–फेब्रुवारी 2026 दरम्यान होऊ शकते, तर लेखी परीक्षा मार्च–एप्रिल 2026 मध्ये अपेक्षित आहे.

राष्ट्रीयत्व: भारतीय नागरिक
वय: साधारण 18 ते 28 वर्षे (आरक्षणानुसार सवलत लागू)
शैक्षणिक पात्रता: किमान 12वी उत्तीर्ण
लिंग: पुरुष व महिला दोघेही पात्र

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असते. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट mahapolice.gov.in किंवा maharashtrapolice.gov.in वर जाऊन अर्ज करावा.

1. शारीरिक चाचणी (Physical Test / PET)
2. लेखी परीक्षा
3. कागदपत्र पडताळणी
4. वैद्यकीय तपासणी
अंतिम निवड गुणवत्ता यादीवर आधारित असते.

लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ (MCQs) स्वरूपाची असते.
विषय: मराठी व्याकरण, गणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी व चालू घडामोडी.

नाही. महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते.

शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांवर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते.

• अधिकृत अभ्यासक्रमानुसार अभ्यास करा
• रोज शारीरिक सराव ठेवा
• मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवा
• मॉक टेस्ट व सराव परीक्षा द्या
• चालू घडामोडींवर लक्ष ठेवा

महाराष्ट्र पोलीस भरती 2026

महाराष्ट्र पोलीस भरती 2026 साठी आम्ही एक विश्वासार्ह ऑनलाइन प्रशिक्षण केंद्र म्हणून कार्यरत आहोत. येथे लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि अंतिम निवडीसाठी परीक्षाभिमुख अभ्यास साहित्य, थेट ऑनलाइन टेस्ट सिरीज, सराव परीक्षा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. पोलीस दलात सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण तयारीसाठी आवश्यक असे व्यावसायिक व शिस्तबद्ध प्रशिक्षण आम्ही देतो.

Shaurya Preparatory Institute SPI Logo
Shaurya Preparatory Institute SPI Logo
Pariksha Portal Logo
G20 Logo
NDA Logo

Pariksha Portal
महाराष्ट्र पोलीस भरती 2026 साठी स्मार्ट तयारी

Pariksha Portal हे महाराष्ट्र पोलीस भरती 2026 साठी खास विकसित केलेले एक प्रगत ऑनलाइन परीक्षा व अभ्यास व्यासपीठ आहे. येथे तुम्हाला परीक्षाभिमुख MCQ टेस्ट सिरीज, विषयवार सराव प्रश्न, त्वरित निकाल, सविस्तर उत्तरांचे स्पष्टीकरण आणि सोप्या व मुद्देसूद डिजिटल नोट्स मिळतात. पोर्टलवरील प्रगती विश्लेषण, गुणतक्ते (Score Analysis) आणि कमकुवत भाग ओळखण्याची सुविधा तुमची लेखी परीक्षेची तयारी अधिक प्रभावी बनवते. Pariksha Portal च्या मदतीने नियोजित अभ्यास करा आणि महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याच्या तुमच्या स्वप्नाला योग्य दिशा द्या! 💪🎯

स्मार्ट टेस्ट सिरीज • डिजिटल नोट्स • अचूक विश्लेषण • खात्रीशीर यश

महाराष्ट्र पोलीस भरती 2026


आयोजक समिती

मा. मयूर ढोकचौले सर
संचालक

मा. मयूर ढोकचौळे सर

संचालक, ScaleZen Technologies Private Limited

https://scalezen.in

मयूर ढोकचौळे सर हे ScaleZen Technologies Private Limited चे संस्थापक व दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहेत. शिक्षण क्षेत्रातील दीर्घ अनुभवामुळे त्यांनी CBSE शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच विविध स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये पाच वर्षांहून अधिक काळ प्राचार्य म्हणून कार्य केले आहे.

संरक्षण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यांनी विविध भरती परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून शिस्तबद्ध तयारी व योग्य अभ्यास रणनीतीवर विशेष भर दिला आहे.

शैक्षणिक वर्ष 2024–25 मध्ये, ऑनलाइन मार्गदर्शन बॅच अंतर्गत महाराष्ट्रातील विविध भागांतून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले, जे त्यांच्या प्रभावी शैक्षणिक दृष्टीकोनाचे द्योतक आहे.

ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार आणि परीक्षाभिमुख शिक्षण पोहोचवणे, हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. पारंपरिक वर्गशिक्षणाच्या पलीकडे जाऊन डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने त्यांनी ScaleZen Technologies Pvt. Ltd. ची स्थापना केली.

सध्या ScaleZen Technologies 30 हून अधिक शैक्षणिक संस्थांना शैक्षणिक सल्ला, प्रशासन, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, प्रवेश प्रक्रिया व शैक्षणिक व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये सेवा पुरवत आहे.

ते Pariksha Portal चे निर्मातेही आहेत — हे एक मोबाईल व वेब आधारित व्यासपीठ असून महाराष्ट्र पोलीस भरती 2026 सहित विविध स्पर्धा परीक्षांसाठी दैनिक टेस्ट, अभ्यासक्रमानुसार सराव, डिजिटल नोट्स व कामगिरी विश्लेषण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देते.

महाराष्ट्र पोलीस भरती 2026
मार्गदर्शनासाठी संपर्क करा

खाली दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेलद्वारे आमच्याशी संपर्क साधा किंवा प्रत्यक्ष संस्थेत भेट द्या. संपर्क फॉर्म भरा आणि आमच्या तज्ज्ञांकडून कॉल बॅक मिळवा.

महाराष्ट्र पोलीस भरती 2026

लेखी परीक्षा व शारीरिक चाचणीसाठी विश्वासार्ह मार्गदर्शन

  • call
    9226614841  
  • mark_email_unread
    mhapolicebharti@gmail.com
  • location_on
    दुसरा मजला, जानकी प्लाझा, भगवान महावीर पथ, कोपरगाव, जि. अहिल्यानगर